मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची उपप्रादेशिक परिवाहन अधिकाऱ्यांकडे मागणी_
*कणकवली दि.२७- :* विशाल जाधव याने पेशंटच्या नातेवाईकांशी केलेल्या गैरवर्तनाबाबत आणि त्याच्या नियमबाह्य असलेल्या अॕम्बुलन्सवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी उपप्रादेशिक परिवाहन अधिकाऱ्यांकडे केली आहे. विशाल जाधव याने अॕम्बुलन्स मालक त्याची गाडी क्र. MHO7AJ0153 ही गाडी कोविड प्रेत वाहतुकीसाठी अधिग्रहित केली आहे. सदर गाडी शासनाच्या अधिग्रहित असल्यामुळे तो अॕम्ब्युलन्सची दलाली करतोय तसेच जादा रेट सांगून रुग्णांच्या नातेवाईकांना छळत आहे. ओरोस मुख्यालयातील प्रेत वाहतूक करण्याकरिता वरील अॕम्ब्युलन्स अधिग्रहित केली असल्याने व त्यामुळे आपण शासनाचे कोणीतरी आहोत व आपले कोणी काहीही करू शकत नाही. आपले परिवहन अधिकारी व पोलिस अधिकारी यांच्याशी संबंध आहेत. ते आपले काहीही वाकडे करू शकत नाहीत, अशा आविर्भावात तो पेशंटच्या नातेवाईकांशी उद्धट बोलतो. त्यामुळे अशा अॕम्ब्युलन्सधारकाची अॕम्ब्युलन्स जी कोविड मृतदेह वाहतूक करिता अधिग्रहीत केलेली आहे, ती रद्द करून नवीन निविदा मागवून नवीन नम्र आणि सेवाभावी पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तींना अॕम्ब्युलन्सचा ठेका देण्यात यावा आणि या सदर गाडीवर व अशी उद्धट वर्तवणूक करणाऱ्या विशाला जाधववर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे त्याच्याकडील दुसरी गाडी क्र. MH06AJ5536 ही गाडी शासनाने आरोग्य विभागाची वापरलेली गाडी भंगार लिलावातील असून ती अॕम्ब्युलन्स करीता नोंदणी केलेली असून सदर गाडी ही ४ ऑगस्ट, २००६ ची नोंदणीकृत आहे. १०-१२ वर्षे तिचा वापर झाल्यानंतर शासनाने त्या गाडीचा भंगारात लिलाव केला होता. ती गाडी विशाला जाधव याने अॕम्ब्युलन्स म्हणून नोंदणी करून घेतली आहे. त्या गाडीला १४ वर्षे ९ महीने २० दिवस झालेले असून अशी गाडी अॕम्ब्युलन्स म्हणून वापरल्यास सदर गाडीचा रस्त्यात बिघाड झाला तर अॕम्ब्युलन्समधील रुग्ण दगावू शकतो. त्यामुळे या गाडीची अॕम्ब्युलन्स म्हणून असलेली नोंदणी रद्द करून १५ वर्षांनंतर त्या गाडीचा वापर होण्यास मज्जाव करावा. तसेच देवगड येथे पाठवलेली गाडी क्र. MH01BS0104 ही गाडी अॕम्ब्युलन्स असूनही कोविड पेशंटच्या वाहतुकीसाठी तिचा वापर केला जातो. तसेच त्या गाडीचा इन्शुरन्सदेखील नाही. तरी ही गाडी आणि वरील दोन्ही गाड्यांवर निलंबित करून त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परशुराम उपरकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली आहे.
