रिनेसंस द स्टेट पुस्तकावर बंदी घाला कणकवली मराठा समाजाची पोलिसांकडे मागणी

छत्रपती संभाजी राजे व महाराणी सोयराबाई यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप

*💫कणकवली दि.२७-:* गिरीश कुबेर यांच्या “रीनेसंस द स्टेट” या पुस्तकामध्ये शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचे वाचनात आले आहे. त्यामुळे या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभर कायमची बंदी घालण्यात यावी. तसेच वाजारात विक्रीसाठी असणारी सर्व पुस्तके शासनाच्या ताब्यात घ्यावीत, अशी मागणी सकल मराठा समाज, कणकवली यांच्याद्वारे कणकवली पोलिस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला तसेच प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे योगदान सर्वश्रुत आहे. काहीतरी विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी किंवा खोडसाळपणा करून प्रसिध्दी मिळविण्यासाठी अशा प्रकारचे संदर्भहीन लिखाण बरेच लोक करत असतात. यापैकीच एक गिरीश कुबेर हे असावेत. त्यामुळे गिरीश कुबेर यांचा जाहिर निषेध आहे. सरकारने या संवेदनशील विषयामध्ये लवकरात लवकर लक्ष घालावे व योग्य ती कायदेशीर कारवाई त्वरीत करावी, असे मागणी मराठा समाजाद्वारे करण्यात आली आहे. “रीनेसंस द स्टेट” या पुस्तकाचे लेखक गिरीश कुबेर यांच्यावर भां. द. वि. कलम २९२, २९४, ५००, ५०१, ५०२, ५०४, ५०५ (२), सह ३४ नुसार कारवाई करण्यात यावी. तसेच या पुस्तकच्या प्रकाशकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा, असे मराठा समाजाने दिलेल्या निवेदनाद्वारे म्हटले आहे. यावेळी महेंद्र सांबरेकर, सुशांत राउळ, सुशांत दळवी, सुशील सावंत, बबलु सावंत, बच्चु प्रभुगांवकर, अमेय मडव, अनुप वारंग, पप्पु यादव, हेमंत कांडर, धनंजय सावंत, महेंद्र गांवकर, अमित भालेकर, मनोज घाडीगांवकर, यश सावंत तसेच इतर मराठा समाजाचे मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page