सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या सूचनेनुसार कोविड रुग्णांना उकडलेल्या अंड्यांचे वाटप_
*💫वेंगुर्ले दि.२७-:* जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढती कोविड रुग्णसंख्या व मृत्यूदर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. या कोरोना विषाणू आपत्ती व्यवस्थापनात कोविड रुग्णांनी सकस आहार घेऊन इम्युनिटी वाढवणे हेच प्रमुख आरोग्य धोरण असल्याने वेंगुर्ला मनसेने पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या सूचनेनुसार पुढील 15 दिवस कोविड रुग्णांना प्रोटीन वाढीसाठी उकडलेल्या अंड्यांचे वाटप हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने काल दि.26 मे 2021 रोजीपासून वेंगुर्ले येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह वेंगुर्ले कॅम्प तसेच शिरोडा येथील सुरू असलेल्या कोवीड सेंटर ठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उकडलेली अंडी वाटण्यात येणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात कालपासून मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे यावेळी वेंगुर्ला तालुकाअध्यक्ष सनी भाकर तालुका सचिव आबा चिपकर मनविसे तालुकाध्यक्ष महादेव तांडेल अंकुश नाईक आदी उपस्थित
