भाजपा तिन्ही विधानसभा मतदार संघात कोविड सेंटर उभारणार

जागा निश्चिती:जिल्हधिकाऱ्यांची मान्यता:प्रत्येकी ऑक्सीजन सह ३५ बेड असणार;राजन तेली यांची माहिती

*💫ओरोस दि.२७-:* जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक कोविड सेंटर ऑक्सीजन व व्हेन्टीलेटर सह उभारण्यात येणार आहे. ३५ बेडची ही तिन्ही सेंटर असणार असून यासाठी जागा निश्चिती झाली आहे. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची याबाबत गुरुवारी भेट घेवून याबाबत मागणी केली आहे. त्यांनी तिन्ही सेंटरला मान्यता दिलेली आहे. ही सेंटर भाजप स्वतः उभी करत असून लागणारे सर्व साहित्य व सुविधा भाजप पुरवीणार आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यानी पत्रकार परिषदेत दिली. कणकवली-देवगड-वैभववाडी मतदार संघात देवगड ग्रामीण रुग्णालय, कुडाळ-मालवण मतदार संघात मालवण कुंभारमाठ येथील पॉलिटेक्निक येथील कोविड केअर सेंटर नजिक आणि सावंतवाडी-वेंगुर्ले-दोडामार्ग मतदार संघात सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद विद्यालय येथे ही तिन्ही सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी ऑक्सीजन, व्हेन्टीलेटर, डॉक्टर यांच्यासह सर्व साहित्य भाजप पुरवीणार आहे, असे यावेळी तेली यानी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page