अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांची माहिती
*💫मालवण दि.२७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे जिल्हा प्रशासनाने प्रत्येक गावात ग्रामविलगीकरण कक्ष निर्माण करण्याचे आदेश ग्रामपंचायतीना दिले आहे. निलक्रांती संस्था गेले वर्षभर कोरोना बधितांना सेवा देत असून ग्रामविलगीकरण कक्षाला संपूर्ण सहकार्य व मार्गदर्शन करण्यास निलक्रांती संस्था तयार आहे, असे निलक्रांती मत्स्य पर्यटन व कृषी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन मध्ये गेला आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधीत रुग्णांना गृह विलगीकरणा ऐवजी ग्रामविलगिकरण करण्याचे आदेश प्रत्येक ग्रामपंचायतीना दिले आहेत व त्याप्रमाणे नियोजन सुरू आहे. अश्या प्रकारची सुविधा देत असताना वैद्यकीय मार्गदर्शन, प्रशिक्षित मनुष्यबळ, वैद्यकीय साधन सामुग्री, आवश्यक औषधे, वेगवान संदेश वहन यंत्रणा, मूलभूत सोयी सुविधा, वाहन व्यवस्था अश्या अनेक गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. नीलक्रांति संस्था गेली वर्षभर शासन मान्य समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्र, कांदळगाव तसेच कोव्हिड केयर सेंटर, कोळंबच्या माध्यमातून शेकडो कोरोना बाधीत रुग्णांना सेवा दिली आहे. तरी या सेवेच्या अनुभवाचा फायदा मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतीना करून द्यावा, या दृष्टिकोनातून विविध ग्रामपंचायतीशी संवाद साधणे सुरू केले आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने परवानगी दिल्यास तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतीने संपर्क साधल्यास कोरोना मुक्ती चा मालवण पॅटर्न होऊ शकेल याची आम्हाला आशा आहे, ग्रामपंचायतीनी माहितीसाठी ९४२२६३३५१८, ९२२५९००३०३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रविकिरण तोरसकर यांनी केले आहे.
