*💫मालवण दि.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः मालवण तालुक्यात होत असलेल्या कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येने चिंतीत बनलेल्या जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आज मालवणचे पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दूरक्षेत्र कट्टाचे पोलीस पथकाने कडक पाऊल उचलत बाजारपेठेत विनाकारण फिरणे, मास्क न लावता फिरणे अशा ३३ जणांवर दंडात्मक कारवाई केली. मालवण तालुक्यात कोरोना रुग्णाचा आलेख चढता राहिला असून त्याला आळा घालणे क्रमप्राप्त आहे म्हणूनच गेले दोन तीन दिवस पोलीस प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या वर तसेच विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे .आज कट्टा बाजारपेठेत मालवणचे पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कारवाई करण्यास सुरूवात केली पोलिसांनी अचानक कडक कारवाई करण्याचे पाऊल उचलल्याने बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांची पळापळ होत होती. कट्टा बाजारपेठेच्या दोन्ही बाजूला पोलिसांची पथके तैनात होती. त्यामुळे पळवाटा शोधून जाणाऱ्या प्रत्येकाची तारांबळ उडाली होती. पोलिसांच्या या पथकात आर. व्ही. मुंढे, योगेश सराफदार, संतोष पुटवाड यांचा समावेश होता ही कारवाई यापुढे आता सुरुच राहणार असल्याची माहिती कट्टाचे पोलीस अम्मलदार आर. व्ही. मुंढे यांनी दिली.
विनाकारण फिरणाऱ्या 33 जणांवर कट्टा पोलिसांची कारवाई…
