गौरव लुडबे मित्रमंडळातर्फे कुंभारमाठ येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा…

ग्रामस्थांमधून होत आहे कौतुक_

*💫मालवण दि.२६-:* तौक्ते वादळाच्या तडाख्यात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कुंभारमाठ येथील ग्रामस्थांना खंडित वीज पुरवठ्यामुळे पाणीपुरवठा होत नसल्याची माहिती मिळताच युवा सामाजिक कार्यकर्ते गौरव लुडबे यांनी स्व:खर्चातून मित्रमंडळींना साथीला घेऊन जनरेटरच्या साहाय्याने कुंभारमाठ येथील ग्रामस्थांच्या विहिरींना पाण्याचा पंप जोडून ग्रामस्थांची पाणी समस्या दूर केली त्यांच्या या कार्याबद्दल गौरव लुडबे आणि मित्रमंडळीचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे. तौक्ते वादळात मालवण तालुक्यात सर्वत्र वीजपोल व वीज वाहिन्यांचे नुकसान झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला. या पार्श्वभूमीवर कुंभारमाठ गावातही गेले काही दिवस लाईट नसल्याने ग्रामस्थांना आपल्याजवळील विहीर व इतर पाण्याच्या स्रोतातून पाणी उपसा करणे मुश्किल बनले होते. लाईट अभावी पाणी मिळवणे कठीण बनल्याने ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन युवा कार्यकर्ते गौरव लुडबे यांनी स्व:खर्चातून जनरेटर उपलब्ध केला. मित्रमंडळींच्या सहकार्यातून टेम्पोमधून हा जनरेटर कुंभारमाठ गावात फिरवून त्याद्वारे विहिरीच्या पंपांना वीज पुरवठा करून पाण्याचा उपसा करून दिला. यामुळे ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होऊन त्यांची अडचण दूर झाली. गौरव लुडबे व त्यांच्या मित्रमंडळींच्या या कार्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले.

You cannot copy content of this page