*💫वैभववाडी दि.२६-:* वैभववाडी तालुक्यात वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी वैभववाडी पोलिसांनी शहरात विनाकारण फिरणाऱ्या 4 वाहन चालकांवर 188 प्रमाणे कारवाई केली.त्यांच्यावर वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे.तर 12 जणांवर दंडात्मक कारवाई केली . वैभववाडी तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहेत.कामाशिवाय लोक बाजारात फिरत असतात.कोरोना संसर्ग कमी व्हावा या हेतूने वैभववाडी पोलिसांनी सकाळी व संध्याकाळी संभाजी चौक येथे ही कारवाई केली. बुधवारी 26 मे रोजी शासनाच्या आदेशानुसार पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यावर 188 प्रमाणे 4 वाहन चालकांवर गुन्हा नोंद केला. तर अन्य 12 वाहन चालकांना दंडात्मक कारवाई केली.वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह ,पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू जामसंडेकर,मारुती साखरे व अन्य पोलिसांनी केली.
वैभववाडी शहरात विनाकारण फिरणाऱ्या 4 जणांवर पोलिसांची कारवाई…
