शहरात ३० तर ग्रामीणात १२१
*💫सावंतवाडी दि.२६-:* तालुक्यात आज १५१ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३० तर ग्रामीण भागात १२१ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात खासकीलवाडा ३, जूनाबाझार ५, एस. टी स्टेट १, भटवाडी ४, माठेवाडा १०, बाहेरचा वाडा ३, सबनीस वाडा १, सालईवाडा १, सावंतवाडी २ असे रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात आरोस २, सातर्ड ५, मळेवाड ४, भटपवणी ५, नेमळे ५, तळवडे १, इन्सुली २, कोलगाव २२, बांदा ८, कास १, शेरले ३, शिरशिंगे ३, सांगेली ८, कलंबिस्त २, आरोंदा ११, साटेली १, तळवने १, चराठा १०, सोनुर्ली १, माजगाव ८, मांडखोल ४, ओटवणे ३, कारीवडे ३, सातोसे ४, डिंगणे १, मडूरा १, देवसु १, तीरोडा १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६२७ रुग्ण सक्रिय आहेत.
