‘एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी’ राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना उपक्रम राबवीणार

जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत यांची माहिती;शाळा फी, अन्य शुल्कबाबत शिक्षण संस्थाना निवेदन देणार

*💫सावंतवाडी दि.२६-:* राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोकण विभागाचे अध्यक्ष किरण शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत तालुकाध्यक्ष प्रतीक नाईक आक्रमक भूमिका घेणार आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचा मान ठेवत सर्व शिक्षण संस्थांनी आपल्या शिक्षण शुल्कात सरसकट कपात करावी, विद्यार्थी ज्या सुविधा वापरत नाहीत त्याचे शुल्क आकारू नये, शिक्षण शुल्क समितीने लवकरात लवकर राज्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या शुल्क निच्छितीची पुनः प्रक्रिया करून नवीन शुल्क निच्छित करावे. तोपर्यंत कोणत्याही पालकांकडून शिक्षण संस्थाना शुल्क आकारण्याचा हक्क नाही,असा आदेश काढावा, केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना 0% व्याजदराने शैक्षणिक कर्ज योजना लागू करण्याचे निर्देश द्यावेत, नर्सरी ते १० वीचे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थानी शैक्षणिक साहित्य (पुस्तके, वह्या इ.) शाळेतूनच घ्यावे लागतील ही सक्ती करु नये. तसेच बोर्डाने (सिबीएससी, आयसीएसई, स्टेट) जी पुस्तके निर्देशित केली आहेत तीच पुस्तके शिकवताना वापरावीत. दुसऱ्या कोणत्याही प्रकाशनाची महाग पुस्तके पालकांना घेण्यास भाग पाडू नये. शाळा- महाविद्यालय सोडण्यास भाग पाडू नये. या अभियानांतर्गत सर्व शिक्षण संस्थांना निवेदन देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

You cannot copy content of this page