तहसीलदार म्हात्रे यांची माहिती;वाढत्या कोरोना रुग्णाच्या पाश्वभूमिवर निर्णय
*💫सावंतवाडी दि.२६-: सावंतवाडी तालुक्यात ५ जुन पर्यंत सर्व कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून, कोणत्याही कार्यक्रमास परवानगी देण्यात येणार नसल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे. तसेच यावेळी या दिवसात पूर्वीच परवानगी देण्यात आलेल्या कार्यक्रमांवर विशेष स्कॉट ची करडी नजर असणार आहे. त्याचप्रमाणे दुकानावर देखील करडी नजर असणार आहे. याच बरोबर आज पर्यंत होम विलगी करण मध्ये असलेली व्यक्ती आणि आज पासून स्वॅब टेस्ट दिलेली व्यक्ती इतरत्र फिरताना दिसल्यास त्याला १० हजार रुपये दंड करण्यात येणार असून, त्याने हा दंड भरण्यास नकार दिल्यास त्याच्या जमिनीवर किंवा घरावर बोजा लावण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिला आहे.
