कॉलेजला मुंबई विद्यापीठाचा मानाचा “बेस्ट कॉलेज अवॉर्ड ” मिळाल्याबद्दल अभिनंदन..
⚡वेंगुर्ला ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज शनिवारी 18 एप्रिल रोजी वेंगुर्ला येथील प्रसिद्ध बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. धनराज गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
व वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांचे स्वागत केले.
यावेळी संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षचे समन्वयक प्रा. एस. एच माने, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वसंतराव पाटोळे, लेफ्टनंट डॉ. बी. जी. गायकवाड, गणित विभाग प्रमुख प्रा. एम. आर. नवत्रे, त्यांचे सहकारी प्रा. बी एम भैरट, उद्यानविद्या प्रमुख वीरेंद्र देसाई तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी कॉलेजचे संस्थापक बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कॉलेजला मुंबई विद्यापीठाचा मानाचा “बेस्ट कॉलेज अवॉर्ड ” मिळाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेजचे विशेष अभिनंदन केले.याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या चेअरमन डॉ. मंजिरी देसाई – मोरे , सेक्रेटरी प्रो. जयकुमार देसाई तसेच पेट्रोन कौन्सिल मेंबर बाळासाहेब देसाई यांनी या सदिच्छा भेटीबद्दल जिल्हाधिकारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी यांनीही महाविद्यालयाच्या प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त करून संस्था आणि महाविद्यालयाला एक सक्षम प्राचार्य लाभले आहेत, असे मत व्यक्त केले.
