⚡वेंगुर्ला ता.१७-: महाराष्ट्र शासन ISO मान्यता प्राप्त – भारत सरकार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय नोंदणीकृत संस्था मुंबई मराठी युवा पत्रकार संघ – ओंकार अकॅडमी ऑफ आर्ट्स संविधान परिषद पुरस्कार वितरण सोहळा २०२६ अंतर्गत मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात वेंगुर्ला तालुक्यातील हरिचरणगिरी येथील शिल्पकार दत्तात्रय (हेमंत) अशोक मठकर यांना “भारत रत्न गौरव श्री” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार मुंबई मराठी युवा पत्रकार संघ व ओंकार अकॅडमी ऑफ आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी
शिवश्री काझी सोहेल शेख – (छत्रपती शिवाजी महाराज यांचे सचिव वकील पारसनीस शिवश्री काझी हैदर यांचे १३ वे वंशज), सानिका मोजर ( प्रसिद्ध अभिनेत्री)
सुभेदार महेंद्र गवई( निवृत्त भारतीय लष्कर) आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात दत्तात्रय (हेमंत) मठकर यांच्या शिल्पकलेतील योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
वेंगुर्ला हरिचरणगिरी येथील शिल्पकार दत्तात्रय मठकर यांचा मुंबई येथे सन्मान…
