विमानतळावर प्रत्यक्ष प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत…

⚡दोडामार्ग ता.१५-:
दोडामार्ग इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, दोडामार्ग येथील उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांना विमानतळावरील प्रत्यक्ष कामकाज, शिस्तबद्ध कार्यपद्धती व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. संवाद कौशल्य, वेळेचे नियोजन व टीमवर्क यांसारख्या गुणांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.
एव्हिएशन, पर्यटन व सेवा क्षेत्रातील करिअर संधींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. ही भेट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरली.

You cannot copy content of this page