आंबोलीत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलमध्ये साहसी व व्यक्तिमत्व विकास शिबिराचा शुभारंभ…

⚡आंबोली, ता.१८-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आंबोली येथे ‘साहसी व व्यक्तिमत्व विकास’ या पाच दिवसीय शिबिराचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स-सर्व्हिसमेन असोसिएशनच्या सहकार्याने कर्नल अंकुश फडके फाउंडेशन आणि सैनिक स्कूल आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १६ एप्रिल २०२६ ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना विविध साहसी उपक्रमांचा अनुभव देण्यात येत आहे. यात रॉक क्लायंबिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, झिप लाईन, कमांडो नेट, बर्मा ब्रिज, तसेच प्राथमिक उपचार, नेतृत्व विकास मार्गदर्शन, समूह चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम आदींचा समावेश आहे.१० वर्षांवरील मुलामुलींना या शिबिरात प्रवेश देण्यात आला असून, आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास घडविण्याच्या उद्देशाने हे शिबिर उपयुक्त ठरत आहे.शिबिराचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊत, सचिव दीपक राऊत तसेच मुख्याध्यापक नितीन दशरथ गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page