उद्योगपती देवेंद्र नाईक यानी वाढविले श्रीफळ
*💫सावंतवाडी दि.२६-:* शहरातील खासकिलवाडा भागातील आयुर्वेद कॉलेज नजीक कै. डॉ. वारंग पाणंद येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज उद्योगपती देवेंद्र जयवंत नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला आहे. यावेळी नगरसेविका सौ. समृध्दी विरनोडकर, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, बुथ अध्यक्ष दिना नाईक, विलास राऊळ, विनोद वारंग आदी उपस्थित होते.
