⚡सावंतवाडी ता.१७-: कोकणातील उद्योन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे व त्यांना प्रोत्साहीत करावे या उद्देशाने श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग रजि.नं. F-0004866(SDD) व स्वयंभू कला क्रीडा मंडळ, आजगांव आयोजित शनिवार २५ व रविवार २६ एप्रिल रोजी “राधाकृष्ण चषक २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे हे आठवे पर्व असून,शनिवार दि. २५ रोजी दुपारी ३.०० वा.शास्त्रीय गायन स्पर्धा (हिंदुस्थानी ख्याल)तसेच रविवार दि. २६ एप्रिल रोजी दुपारी ३.०० वा.सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा, श्री देव वेतोबा मंदिर सभागृह, आजगांव येथे होणार आहे.सदरील स्पर्धा सिंधुदुर्ग-रत्नागिरी-गोवा मर्यादित असून,
शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी व सर्व संगीतप्रेमींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री राधाकृष्ण संगीत साधना,सिंधुदुर्ग व स्वयंभू कला क्रीडा मंडळ यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप – शास्त्रीय गायन स्पर्धा (हिंदूस्थानी ख्याल)
शनिवार दि. २५ एप्रिल २०२६,दुपारी ३.०० वा.उद्घाटन सोहळा (मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत),दुपारी ३.३० वा. मुख्य स्पर्धा,रात्रौ ८.३० वा.मान्यवर परिक्षकांचे मार्गदर्शन,रात्रौ ९.०० वा. स्पर्धेचा निकाल व बक्षिस समारंभ, समारोप.
रविवार दि. २६ एप्रिल – सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा
दुपारी ३.०० वा.उद्घाटन सोहळा (मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत)
दुपारी ३.३० वा.मुख्य स्पर्धा लहान गट सादरीकरण, मोठा गट सादरीकरण,रात्रौ ८.३० वा. स्पर्धा निकाल व बक्षिस समारंभ,समारोप.
