⚡दोडामार्ग ता.१७-:
लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमास मा. श्री. चंदन सिन्हा, मा. श्री. परेष व्यास, मा. श्री. राजेंद्र केरकर, मा. श्री. विवेकानंद नाईक, डॉ. हेमंत पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी नवनिर्माण शिक्षण संस्था, रत्नागिरीचे कार्याध्यक्ष मा. श्री. अभिजित हेगशेट्ये होते.
प्राचार्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, उद्योग-व्यवसाय व विविध क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दर्शनी कोटकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. आर. एस. इंगळे यांनी केले.
लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ उत्साहात…
