सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला -शिरोडा येथे वनविभागाची जबरदस्त मोठी दिमाखदार कारवाई..

9.120 कि.ग्रॅ. वजनाचे अंबरग्रीस जप्त : 4 संशयिताना अटक..

⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला तालुक्यातील
शिरोडा परिससामध्ये वन्यप्राणी ब्लु व्हेल (अनुसुची 1) प्राण्याचा पदार्थ उलटी (अंबरग्रीस) बेकायेदशिररित्या जवळ बाळगुन त्याची विक्री करणार असल्याची माहिती सचिन शिडतुरे (वनक्षेत्रपाल फिरते पथक सावंतवाडी) यांना मिळाल्यानुसार गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी रोजी मिलीश शर्मा (उपवनसंरक्षक सावंतवाडी), संजय वाघमोडे (विभागीय वनअधिकारी दक्षता कोल्हापूर), डॉ. सुनिल लाड (सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करुन तसेच काही टिम तयार करण्यात आल्या.वनक्षेत्रपाल फिरते पथक व वनपरिक्षेत्र कुडाळ मधील स्टाफ यांच्या समवेत बनावट ग्राहक तयार करुन सापळा रचण्यात आला. त्यानुसार सायंकाळी 7 वा. च्या सुमारास वन्यप्राणी ब्लू व्हेलची उलटी बेकायदेशिर रित्या बाळगल्या प्रकरणी वनगुन्हयाची कारवाई करुन शिरोडा, ता. वेंगुर्ला परबगाव येथील रणजित रामचंद्र नायर, वय 40 वर्षे, रा. परबगाव शिरोडा, गुरुनाथ नाईक वय 70 वर्षे रा. परबगाव शिरोडा, विभव आडारकर, वय 35 वर्षे, रा. शिरोडा ता. वेंगुर्ला, नितेश मनोहर पांडजी वय 33 वर्षे, रा. रेडी, ता. वेंगुर्ला यांना संशयीत म्हणुन अटक करण्यात आलेली आहे. त्या बरोबर त्यांच्या ताब्यातुन 9.120 कि.ग्रॅ. वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले आहे. सदरचे अंबरग्रीस संशयित 4 जणांना सुमारे 7 कोटी रुपये किंमतीस विक्री करायावयाची होती. ब्लू व्हेल माशाची उलटीस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी मागणी व किंमत असल्याने पैशांच्या लोभापायी अशा स्वरुपाचे वनगुन्हे सध्या उघडकिस येत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे अंबरग्रीस अथवा वन्यप्राण्याचे मृगयाचिन्ह, उपपदार्थ आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ लगतच्या वनाधिकारी यांना कळविण्यात यावे, असे आवाहन वनक्षेत्रपाल फिरते पथक सावंतवाडी यांनी केले आहे.सदरची कारवाई सचिन शिडतुरे (वनक्षेत्रपाल फिरते पथक), अमित कटके( वनक्षेत्रपाल संशोधन दोडामार्ग), सावळा कांबळे( वनपाल वेंगुर्ला मठ ), महेश पाटील(वनपाल फिरते पथक), ब्रम्हकुमार भोजने, (वनरक्षक तुळस) संग्राम पाटील(वनरक्षक आंबोली), अनिकेत माने (वनरक्षक माणगाव), रविंद्र पाटील (वनरक्षक फिरते पथक), रिषीका होले(वनरक्षक फिरते पथक), नितीन सावंत, चालक वनविभाग यांनी यशस्वीरित्या पार पाडली. याबाबत सर्व टीमचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page