तुळस येथे उद्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर…

वेंगुर्ला
महाराष्ट्र शासन
महसूल विभाग मार्फत
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान-टप्पा-१ अंतर्गत शुक्रवार 17 एप्रिल रोजी मातोंड मंडळ मध्ये
उत्सव मंगल कार्यालय तुळस येथे सकाळी १० ते सायंळाळी ५ वाजेपर्यंत
मातोंड मंडळस्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी आमदार
दिपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे,
उपजिल्हाधिकारी
आरती देसाई, सावंतवाडी
प्र. उपविभागीय अधिकारी शारदा पोवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.०१ राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने हे मंडळ स्तरावर एक दिवसीय समाधान शिबीराचे आयोजन
करण्यात आले आहे.
सदर शिबीरामध्ये महसुल विभागाशी संबंधीत विविध प्रलंबित प्रकरणाचा निपटारा, ७/१२ दुरुस्ती, फेरफार प्रकरणे निकाली काढणे तसेच एक खिडकी योजना, डिजिटल ७/१२ वाटप, प्रमाणपत्र वितरण तक्रार निवारण ई-मोजणी, पीएम किसान, अग्रीस्टेंक आदी सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page