प्राची इस्वलकर यांची जि.प. समाजकल्याण व शिक्षण समितीवर निवड…

कणकवली : खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित जि.प. सदस्या प्राची देवानंद इस्वलकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व शिक्षण या दोन महत्त्वाच्या विषय समित्यांवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजप व शिवसेना यांची सत्ता असून अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध विषय समिती सभापतींच्या निवडी अलीकडेच पार पडल्या. त्यानंतर झालेल्या जि.प. सदस्यांच्या सभेत विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेल्या महिला उमेदवार तथा खारेपाटण गावच्या माजी सरपंच प्राची इस्वलकर यांची समाजकल्याण व शिक्षण समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

You cannot copy content of this page