डिगस हायस्कूल जवळ जाणारा रस्ता अडवला…

नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू..

सिंधुदुर्गनगरी ता १६
कुडाळ तालुक्यातील डीगस घाण्याचीवाडी, सोनारगाळी ते डीगस हायस्कूल (रस्ता क्रमांक २३)वर काही व्यक्तीकडून अनधिकृत पणे निस (अडथळा) मारून रस्ता अडविण्यात आला आहे. यामुळे शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक,गंभीर रुग्ण, आणि वाडीतील ग्रामस्थांचा येण्या जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी हा मार्ग तात्काळ खुला करावा. या मागणीसाठी डीगस ग्रामस्थांनी आज पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

जिल्हाधिकारी यांना डीगस ग्रामस्तानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , कुडाळ तालुक्यातील डीगस येतील घाण्याची वाडी, सोनारगाळी ते डिगस हायस्कूल (रस्ता क्रमांक २३) वर काही व्यक्तींकडून अनधिकृत पणे “नीस”(अडथळा) मारुन रस्ता अडविण्यात आला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, वाडीतील ग्रामस्थ तसेच गंभीर रुग्ण यांना रहदारीचा रस्ता बंद झाला आहे. याचा त्रास सहन करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा इतर वाहने जाण्यासही मार्ग उरलेला नाही. याबाबत यापूर्वीही लेखी कळवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते मात्र अद्याप प्रशासनाकडून सदर अडथळा हटवून रस्ता मोकळा करण्यात आलेला नाही. या रस्त्याबाबत दिनांक ११ एप्रिल २००७ मध्ये जमीन मालकाची संमती असूनही व हा रस्ता २३ नंबर ला नोंद असूनही हा रस्ता रहदारीसाठी खुला करण्याबाबत प्रशासनाकडून किंवा ग्रामपंचायतीकडून कोणत्याही हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. गेली वीस वर्षे या रस्त्याबाबत शासनाकडे वेळोवेळी पत्र व्यवहार सुरू आहेत. तरी अद्याप न्याय मिळालेला नाही. तसेच हा रस्ता ग्रामपंचयत दप्तरी २३ नंबर ला नोंद असूनही त्यावर शासनाचा निधी खर्च करण्यात आलेला नाही व रस्त्याची हद्द ही निश्चित केलेली नाही. त्यामुळे सदर रस्त्यावर जमीन मालकांनी “निस” मारून हा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. तरी शासनाने व प्रशासनाने यावर योग्य ते निर्णय घेऊन हा रस्ता कायम रहदारीसाठी खुला करावा. अशी मागणी केली आहे. याकड़े प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डीगस ग्रामस्थांनी आज पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे व जोपर्यंत रस्ता खुला केला जात नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील. असा निर्धार केला आहे. यावेळी डीगस ग्रामस्त स्वप्निल धावले,बापू धावले,सुरेश शिरोडकर,स्वप्नाली धावले,अनंत गोसावी,पांडुरंग शिंदे, पुरुषोत्तम कुबल,मंगेश शिरोडकर आदि उपोषणात सहभागी झाले आहेत.

You cannot copy content of this page