वायरी भूतनाथ येथे पारंपारिक शिवजन्मोत्सवाचे आयोजन…

⚡मालवण ता.१४-:
शिवजयंती उत्सव मंडळ, वायरी भूतनाथ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ‘पारंपारिक शिवजन्मोत्सव साजरा होणार असून यानिमित्त दि. १९ व २० एप्रिल रोजी वायरी भूतनाथ येथील टिकम शाळेमागे विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये १९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण महापूजा व महाआरती, सायंकाळी ७ वा. सर्व भाविकांसाठी महाप्रसाद व तीर्थप्रसादाचे वाटप, सायंकाळी ७.३० वाजता सुश्राव्य भजन, रात्री ९.३० वाजता रसिकांच्या मनोरंजनासाठी ‘ओमी डान्स अकॅडमी वेंगुर्ला’ पुरस्कृत ‘नटरंग’ हा बहारदार व्हरायटी शो सादर केला जाणार आहे.

दि. २० एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता ‘बाळ दांडेश्वर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, दांडी’ यांचा वसंत परब दिग्दर्शीत ‘अंजनी हनुमान युद्ध’ हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या दोन्ही दिवसांच्या सर्व कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवजयंती उत्सव मंडळ वायरी भूतनाथ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page