⚡मालवण ता.१४-:
मालवण तालुक्यातील कांदळगाव देऊळवाडी येथील जयराम नारायण परब यांच्या घरा शेजारील जुने मोठे हापूस आंब्याचे मोठे कलमी झाड रविवारी सायंकाळी कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र घराच्या दर्शनी भागाचे तसेच घरासमोरील अंगणातील मोटरसायकलचे नुकसान झाले.
कांदळगाव देऊळवाडी परिसरातील जयराम परब यांच्या घरा शेजारी जुने मोठे हापूस आंब्याचे कलम मुळातून कमजोर झाले होते. रविवारी हे झाड अचानक कोसळून परब कुटूंबियांच्या घराचे नुकसान झाले. झाड कोसळल्यावर स्थानिक ग्रामस्थ जीवन कांदळगांवकर, जयवंत राणे, रोहन राणे, शांताराम चव्हाण, गीतेश कोदे यांनी घटनास्थळी धाव घेत परब कुटुंबियांची चौकशी केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, जयराम परब यांच्या घरासमोरील अंगणात उभ्या करून ठेवलेल्या मोटर सायकलचे आणि घराच्या दर्शनी भागाचे मिळून सुमारे ५० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. कांदळगाव तलाठी यांनी घटनेचा सोमवारी पंचनामा करून नुकसानीची नोंद केली.
