मळेवाड येथे १५ रोजी श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी सोहळा…

⚡सावंतवाडी ता.१४-: श्री काशिकल्याण ब्राह्मणदेव कला क्रीडा मंडळ, मळेवाड (कुंभारवाडी) आणि ग्रामस्थ यांच्या वतीने बुधवार दि. १५ एप्रिल रोजी वरची मळेवाड , कुंभारवाडी येथे श्री संत शिरोमणी गोरा कुंभार पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्त सकाळी ८.३० वा. धार्मिक विध, सकाळी ९.०० वा. श्री संत शिरोमणी गोरा कुंभार मुर्तीपूजन,सकाळी ९.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी १२.३० वा. आरती तीर्थप्रसाद,दुपारी १.०० वा. महाप्रसाद, सायं. ५.०० वा. भजन,साय. ६.०० वा.विद्यार्थी गुणगौरवपर कार्यक्रम व मुलांचे सांस्कृतिक कार्यकम, रात्रौ. ८.३० वा.श्री सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ आवेरा, ता. वेंगुर्ला यांचा
“श्री क्षेत्र गाणगापूर”हा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी सर्व भाविकांनी व नाट्यप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री काशिकल्याण ब्राह्मणदेव कला क्रीडा मंडळ,आणि कुंभारवाडी ग्रामस्थ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page