सभापती अजिंक्य पाताडे, जी प सदस्य संतोष साटविलकर यानी केले प्रयत्न
*💫मालवण दि.२५-:* नांदोस ग्रामपंचायत येथे कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी १०५ जणांना लस देण्यात आली. या लसीकरण कार्यक्रमासाठी सभापती अजिंक्य पाताडे, सहायक गटविकास विकास अधिकारी श्याम चव्हाण, सरपंच आरती नांदोसकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक नांदोसकर आदी उपस्थित होते. सदर लसीकरण कार्यक्रम नांदोस गावासाठी मिळवून देण्यासाठी सभापती अजिंक्य पाताडे, जि. प. सदस्य संतोष साटविलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी काणेकर सिस्टर, भोरे सिस्टर, श्री. नांगरे, लोबो सिस्टर, आरोग्य सहाय्यक चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश गावडे, श्रेया नांदोसकर, राधिका चव्हाण यांच्यासह आशा सेविका मोनिका डॉन्टस, साक्षी पार्टे, अंगणवाडी सेविका चिंदरकर, विजय निकम, राजन गावडे, ग्रामसेवक लक्ष्मण सरमळकर, माध्यमिक हायस्कूलचे शिक्षक श्री. चांदेरकर यांचे सहकार्य लाभले.
