शिरशिंगे राणेवाडी मुख्य रस्त्यासाठी ५ लाखांचा निधी मंजूर…

संजू परब यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ: आमदार केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून रक्कम मंजूर..

⚡सावंतवाडी ता.०८-: शिरशिंगे येथील राणेवाडी मुख्य रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणासाठी 5 लाख रुपये मंजूर झाले असून माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या कामाचा शुभारंभ आज जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी 5 लाख रुपये श्री. केसरकर यांच्या विकास निधीतून मंजूर झाले. या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला‌. यावेळी पुढील कामासाठी देखील आपण तुम्हाला पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करून देतो असे आश्वासन देखील यावेळी परब यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले. याप्रसंगी शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी तसेच गावातील प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page