⚡बांदा ता.०७-: बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या खासदार नारायण राणे चषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ बुधवार दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी ठीक ९ वाजता पार पडणार आहे. या समारंभाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला आघाडी अध्यक्षा श्वेता कोरगावकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, बांदा सरपंच प्रियांका नाईक, तसेच मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. एक गाव एक संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. प्रथम पारितोषिक एक लाख रुपये रोख व चषक तसेच द्वितीय पारितोषिक रोख 50 हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. इतर वयक्तिक पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत.
बक्षीस वितरण समारंभ 12 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, कुडाळचे आमदार नीलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. या स्पर्धेला परिसरातील क्रिकेटप्रेमींचा मोठा प्रतिसाद अपेक्षित असून, सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब आणि राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केले आहे.
बांदा येथे खासदार नारायण राणे चषक क्रिकेट स्पर्धेचा उद्या शुभारंभ…
