पावसाळ्यापूर्व तयारीला वेग, बांद्यात विद्युत वाहिन्यांलगत झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू…

⚡बांदा,ता.०७-: बांदा शहरात पावसाळ्याच्या काळात वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून पावसाळापूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी गवळीटेंब येथे विद्युत वाहिन्यांवर झुकलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. यासाठी महावितरणकडून क्रेन उपलब्ध करून देण्यात आली होती.
भाजपाचे बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांनी काही दिवसांपूर्वी महावितरणच्या सावंतवाडी कार्यालयाला भेट देऊन पावसाळ्यापूर्व नियोजनबद्ध कामे करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष काम सुरू करत गवळीटेंब परिसरातील विद्युत वाहिन्यांजवळील धोकादायक झाडांच्या फांद्या क्रेनच्या सहाय्याने छाटून सुरक्षिततेची उपाययोजना केली.
या कामावेळी गुरु कल्याणकर (बांदा मंडल उपाध्यक्ष), प्रशांत बांदेकर (ग्रामपंचायत सदस्य), केशव नाईक, अजय परब, रामा पेडणेकर, लक्ष्मण केरीकर, तुलसीदास कविटकर, आदित्य हुमरसकर, रामदास हुमरसकर, सुहास आरोसकर तसेच महावितरणचे लाईनमन महादेव नरे आणि अरविंद कांबळे उपस्थित होते.
पावसाळ्यापूर्वी शहरातील विद्युत वाहिन्यांवर झुकलेली झाडे व धोकादायक फांद्या टप्प्याटप्प्याने छाटण्यात येणार असून त्यामुळे पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये घट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे

You cannot copy content of this page