साटेली-भेडशीची सई धर्णे देशात २५वी; GPAT परीक्षेत दैदीप्यमान यश…

⚡दोडामार्ग ता.०७-:
तालुक्यातील साटेली-भेडशी येथील सई मारुती धर्णे हिने पदवीधर फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट (GPAT) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत देशात २५वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. National Board of Examinations in Medical Sciences मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेस देशभरातून सुमारे ५३,६१७ उमेदवार सहभागी झाले होते.
सईने दहावीपर्यंतचे शिक्षण करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूल, साटेली-भेडशी येथे, तर बारावीचे शिक्षण आमदार दीपकभाई केसरकर सायन्स कॉलेज, दोडामार्ग येथे पूर्ण केले. पुढे Yashwantrao Bhonsale College of Pharmacy येथून बी.फार्म पदवी संपादन केली.
या यशामुळे सईला देशातील प्रतिष्ठित National Institute of Pharmaceutical Education and Research (NIPER) मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेशाची संधी मिळाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page