योजनांचा प्रत्यक्ष आढावा घेत केली कामकाजाची पाहणी..
⚡देवगड ता.०७-:
देवगड पंचायत समिती सभापती पदावर विराजमान झाल्यानंतर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना, तसेच आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा समस्या अशा विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तालुका पातळीवर स्थानिक ग्रामस्थांकडून विविध तक्रारी येत असल्याने कामांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी सभापती गणेश राणे व उपसभापती अमोल लोके हे दोन्ही लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतींना भेट देत असून कामांचा सविस्तर आढावा घेत आहेत.
सोमवारी सभापती गणेश राणे यांनी वरेरी ग्रामपंचायतीला भेट देत वरेरी,वळीवंडे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली.
या भेटीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, सरपंच प्रिया गोलतकर, ग्राम विकास अधिकारी भिसे ,माजी सरपंच पंकज दुखंडे आदी उपस्थित होते.यावेळी विविध योजनांच्या अंमलबजावणीची स्थिती, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा यासंबंधी माहिती घेऊन कामे प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
चांदोशी गावात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याची तक्रार सरपंच व काही ग्रामस्थ घेऊन देवगड पंचायत समिती येथे आले होते.त्यानुसार आज प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायत मध्ये सरपंच ,संबंधित ग्रामस्थ अधिकारी, यांच्या समवेत बैठक घेऊन नियमित पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न करा त्याच बरोबर मे अखेर पर्यंत पाणी पुरवठा बाबत किरकोळ समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना सभापती गणेश राणे यांनी सरपंच , ग्रामसेवक, संबंधित अधिकारी यांना दिल्या यावेळी सरपंच दीपाली मेस्त्री, ग्रामविकास अधिकारी वारंग, ग्रामपंचायत सदस्य समीर शिरवडकर,संभाजी मिराशी, मंगेश धुरी नंदू देसाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यादरम्यान देवगड येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक शेठ पारकर यांचीही सभापतींनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
