⚡दोडामार्ग ता.०७-: तिलारी खोऱ्यातील मोर्ले केर गावात पाच हत्तींचा कळप फिरत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काजू हंगाम सुरू असताना हत्ती बागांमध्ये धुमाकूळ घालत आहेत. काजू बोंडांचा वास लागल्याने सोमवारी सकाळी एका हत्तीने रस्त्यावर येत सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प केली. वन कर्मचाऱ्यांनी त्याला हाकलून लावले.
दरम्यान, अचानक हत्ती समोर आल्याने मोटारसायकलवरील बहीण-भाऊ घसरून पडले व किरकोळ जखमी झाले. हत्तींच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांनी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मोर्ले केरमध्ये हत्तींचा धुमाकूळ…!
