⚡दोडामार्ग ता.०७-: कसई–दोडामार्ग नगरपंचायतमार्फत प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत २८ लाभार्थ्यांना घरकुलासाठी पहिला हप्ता वितरित करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली.
नगरपंचायत येथे लाभार्थ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, मुख्याधिकारी संकेत गायकवाड तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लाभार्थ्यांनी आपल्या समस्या मांडाव्यात व त्यांचे तातडीने निराकरण करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
पक्की घरे नसलेल्या पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह नगरपंचायतीकडे प्रस्ताव सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. उर्वरित हप्ते लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दोडामार्ग : प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत २८ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित…
