निलेश राणे “फक्त भेट नाही, तर मदत थेट” म्हणत देवबागला पोहोचले याचा जाळ खोबरेकरना लागला की काय…

राजवीर पाटील यांचा टोला_

*💫कुडाळ दि.२५-:* तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मुख्यमंत्र्यांची मदत यायच्या आत माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे “फक्त भेट नाही, तर मदत थेट” म्हणत देवबागला पोहोचले याचा जाळ हरी खोबरेकरना लागला की काय, असा टोला युवा मोर्चा सोशल मीडियाचे राजवीर पाटील यांनी लगावला. पाटील म्हणाले, तौक्ते चक्रीवादळ येऊन आठ दिवस उलटून गेले, आमदार खासदार येऊन बसले तरीही आपल्या मतदारसंघातील जनतेचा पाण्याचा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य खोबरेकर सोडवू शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर तिथला दौराच रद्द करत किंमत दाखवली.तुमच्या मतदारसंघातील जनतेला मदत करण्यासाठी निलेश राणेंना तिथे पोहोचावे लागले, याची खरेतर तुमच्यासकट आमदार वैभव नाईक यांनाही लाज वाटायला हवी होती. तुमच्या मतदारसंघात आघाडी सरकारच्या मंत्र्यांना जनतेने रस्त्यावर रिकाम्या पाण्याचे हांडे ठेऊन अडवले, यावर खरेतर तुम्ही अपयश मानून घरात बसायला हवे होते. पण एकूणच शिवसेनेची अवस्था सध्या “गिरे तो भी” अशीच आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळा दोष देण्यात अर्थ नाही.जनतेच्या आस्थेबाबत तुम्ही बोलावे यासारखा दुसरा विनोद नाही. आठ दिवस जनता वीज, पाणी, अन्नधान्य, निवाऱ्याच्या अडचणी घेऊन व्याकुळ होती, अशा स्थितीत वास्तविक तुम्ही निलेश राणे यांचे आभार मानायला हवे होते. मुख्यमंत्री मासे खाऊन गेले तरी या जनतेवर ही दुर्दैवी वेळ का आली, आमदार वैभव नाईक यांनी गेले आठ दिवस नेमके काय पिंजत बसले होते, हे प्रश्न जनतेला पडले आहेत, आणि त्याची उत्तरे लोक भविष्यात नक्की शोधून दाखवतील. सत्ता असूनही तुमच्या आमदार खासदारांचे आणि पालकमंत्र्यांचे काय वजन आहे, हे नियोजित दौरे रद्द करत मुख्यमंत्र्यांनी तीन तासातच तुम्हाला टाटा-बायबाय करून दाखवून दिले आहे. तेव्हा वाहून गेलेली हौदभर लाज लपवायला निलेश राणेंवर टिकेचा जुनाच प्रयोग आता शिळा झाला. त्यापेक्षा दंडाच्या बेटकुळ्या फुगवत हिंमत दाखवायचीच असेल, तर देवबागमध्ये फिरून लोक काय म्हणतात ते ऐकून आमदार वैभव नाईक यांना तोंडावर ऐकवण्याची हिंमत दाखवा, असे आव्हानही राजवीर पाटील यांनी दिले आहे.

You cannot copy content of this page