मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यावर आरोप*
*💫कणकवली दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा रेड झोन होण्यास सत्ताधारी पालकमंत्री, खासदार व आमदार जबाबदार आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था झालेली आहे. आतापर्यंत ६०० च्या वरती रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.सत्ताधाऱ्यांची निष्क्रियेतेमुळे सिंधुदुर्ग रेडझोन होण्यास जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केला. जिल्हा रुग्णालयातील नर्सेसच्या आंदोलनामुळे वास्तव जनतेसमोर आले आहे.मागण्यांसाठी नर्सेसना कालावधीत आंदोलन करावे लागते ही तर नालस्तीच आहे. कोविड रोखण्यासाठी करण्यासाठी खासगी डॉक्टरांच्या पुढाकार आवश्यक आहे.इतर वेळी हेच खासगी डॉक्टर सेवा देतात,आता मागे का राहतात.जिल्ह्यातील ज्या लोकांनी खासदार आमदारांना निवडून दिले, त्या लोकांचा आता कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला. जिल्हा रुग्णालयातील सेवा कोडमडली आहे. पीएम केअर अद्याप व्हेंटिलेटर जोडले नाहीत.व्हेंटिलेटरवर गेल्यावर लोक मरत आहेत,पालकमंत्री घोषणा प्रत्यक्षात येत नाही.अद्याप शव वहिनी दिली नाही.रुग्णवाहिका दिल्या पण अद्याप चालक नाहीत. रॅपिड टेस्ट वाढवल्याने रुग्ण मिळत आहेत,पण त्यांच्यावर उपचार होत नाहीत.जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी जनतेसाठी सेवा देण्याची गरज आहे.जिल्हाधिकारी सांगताहेत डॉक्टर सेवा द्यायला तयार नाहीत.मुबंई प्रमाणे खासगी डॉक्टरानी पुढे येण्याची गरज आहे. पालकमंत्री पोकळ घोषणा करताहेत.जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचा मयत झाला.जिल्हा रुग्णालयात पेशंट नातेवाईक तिथेच राहत आहेत.झोपतात आणि मग घरी जातात.कोरोना प्रसार होत आहे.डॉ.नागेश पवार यांची बदली रद्द केली पाहिजे,त्यांना जिल्हात काम करायचे आहे.पालकमंत्री यांनी बदली थांबवण्यासाठी काम केले पाहिजे.गेल्या लाटेत डॉ.पवार यांनी चांगले काम केले असल्याचे परशुराम उपरकर यांनी केला. केवळ खरेदीसाठी सत्ताधारी नेत्यांचा प्रयत्न आहे.नर्सेसना त्रास डॉक्टर देत आहेत,त्रास दिलेला डॉक्टर पालकमंत्री बोलून देखील बैठकीत येत नाही.सिव्हील सर्जन चार्ज आहे,त्यांना बोलून काय होणार? त्यामुळे मेडिकल कॉलेज साठी ५०० मंजूर असलेले डॉक्टर,कर्मचारी भरा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी मनसेच्या वतीने परशुराम उपरकर यांनी केली आहे.
