कणकवली नगरपंचायतीच्या सक्शन व्हॅन व शववाहिकेचे लोकार्पण..

⚡कणकवली ता.०६-: राज्य शासनाच्या माध्यमातून कणकवली नगरपंचायतीला सक्शन व्हॅन व शववाहिका उपलब्ध झाली असून, या दोन्ही वाहनांचे लोकार्पण सोमवारी नगराध्यक्ष संदेश पारकर आणि मुख्यकार्यकारी अधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या सुविधेमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार असून, नागरिकांना आरोग्य व आपत्कालीन सेवांमध्येही मोठा दिलासा मिळणार आहे.

कार्यक्रमास उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, सत्यजित उर्फ बाळू पारकर, लुकेश कांबळे, तसेच नगरसेविका सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, जाई मुरकर, प्रतीक्षा सावंत, मनस्वी ठाणेकर उपस्थित होते.

याशिवाय गणेश उर्फ बंडू हर्णे, संजय कामतेकर, राकेश राणे, सुमित राणे यांच्यासह नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, अधिकारी सोनाली खैरे, अमोल भोगले, ध्वजा उचले, जयश्री ठाकरे, सचिन नेकर, मनोज धुमाळे, अमित मयेकर तसेच कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page