१० एप्रिलला कणकवलीत सोहळा:मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा:सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट..
⚡कणकवली, ता.०६-: कोकणाचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा भाजपा खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हावासियांच्या वतीने “अमृत महोत्सवी वर्ष स्वागत समिती” स्थापन करण्यात आली असून, वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दिनांक १० एप्रिल रोजी सायंकाळी जिल्हा उपरुग्णालय कणकवली समोरील पटांगणावर राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
कार्यक्रमानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा लाईव्ह गायनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, हितचिंतक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागत समितीच्या वतीने करण्यात आले आहे.यंदाच्या वाढदिवसानिमित्त एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक स्वरूपात भेट स्वीकारण्यात येणार आहे. संकलित पुस्तकांचे वितरण जिल्ह्यातील विविध ग्रंथालयांना करण्यात येणार असून, त्यामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळणार आहे.या वाढदिवसापासून पुढील वर्षी १० एप्रिल २०२७ पर्यंत संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कोकणातील जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या नेतृत्वाचा गौरव करण्याची ही संधी असल्याचे स्वागत समितीने नमूद केले आहे.
तरी १० एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या या भव्य सोहळ्यास जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अमृत महोत्सवी वर्ष स्वागत समितीतर्फे करण्यात आले आहे.
