खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी, ता. ०४-: भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त “संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६” अंतर्गत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा शुक्रवार, दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे सुरू होणार आहे.
या स्पर्धेत विविध वयोगटांमध्ये सामने खेळविण्यात येणार असून १३ वर्षांखालील मुले व मुलींसाठी प्रथम पारितोषिक ३००० रुपये व द्वितीय पारितोषिक २००० रुपये ठेवण्यात आले आहे. १७ वर्षांखालील मुलांसाठी प्रथम व द्वितीय पारितोषिक अनुक्रमे ३००० व २००० रुपये आहेत. खुल्या गटात (मुले/मुली) प्रथम ५००० रुपये व द्वितीय ३००० रुपये तर दुहेरी खुल्या गटासाठी प्रथम ६००० रुपये व द्वितीय ४००० रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सरचिटणीस दिलीप भालेकर, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष हितेन नाईक, नगरसेवक तथा सभापती प्रतीक बांदेकर तसेच खेळाडू संकेत राऊळ, शुभम मुळीक, अक्षय पंडित आदी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी इच्छुक खेळाडूंनी नावनोंदणीसाठी पंकज तुळसुळकर (मो. ९१३०६८३४७२) किंवा भाजपा कार्यालय (मो. ७८७५५२५४९६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page