⚡मालवण ता.०४-:
मालवण मेढा येथील श्री काळबादेवी मंदिराचा १२ वा वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. १३ व १४ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त दि.१३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी १ यावेळेत धार्मिक विधी त्रिशक्ती याग होम हवन, सायं. ५ वा. श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ कांदळगाव देऊळवाडी, मालवण. (बुवा : श्री. राजेंद्र दिनकर कोदे, मृदूंगमणी: बंटी कांदळगावकर, तबला साथ : दत्ताराम डिकवलकर) यांचे भजन,
सायं. ७ वा. पारंपारिक आरती, रात्रों ८ वा. शंकर मंदिर मेढा मालवण महिला मंडळ प्रस्तुत रंगमेळा कार्यक्रम, दि. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं ५ वा. महिला हळदी कुंकू समारंभ, सायं. ६ वा. अष्टपैलू कलानिकेतन यांचा भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम (गायक- सुनील परुळेकर), सायं ६:३० वा.
पारंपरिक आरती, रात्री : ८ वा. अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण, वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग, यांचा पारंपरिक दशावतारी नाट्य प्रयोग गजमुख विघ्नेश्वर सादर होणार आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आई काळबादेवी मंदिर विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.
