भाजप युवा नेते विशाल परब यांची माहित..
⚡सावंतवाडी, ता. ४-: भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस ६ एप्रिल रोजी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांनी दिली.
६ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. स्थापना दिनी संपर्क व मंडल कार्यालयांवर ध्वजारोहण, मिठाई व फळवाटप तसेच कार्यकर्त्यांनी घराघरात भाजपाचा ध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासोबतच महापुरुषांना अभिवादन, संविधान वाचन, स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिरे, पाणपोई, पर्यटन स्थळांची स्वच्छता तसेच जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
भाजपाच्या विचारधारेचा प्रसार आणि संविधानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करत या कार्यक्रमांना व्यापक प्रतिसाद देण्याचे आवाहन विशाल परब यांनी केले आहे.
