मुंबईत कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026 चे उत्साहात उद्घाटन…

सिंधुदुर्ग–रत्नागिरीतील प्रॉपर्टींना मुंबईत मोठा प्रतिसाद..

⚡कुडाळ ता.०४-: क्रेडाई सिंधुदुर्ग आयोजित “कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026” या भव्य वास्तू प्रदर्शनाचे उद्घाटन आज दादर येथील क्रीडा भवन मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे उत्साहात पार पडले. सिंधुदुर्ग–रत्नागिरीतील प्रॉपर्टींना मुंबईत मोठा प्रतिसाद मिळत आहे.
क्रेडाई सिंधुदुर्ग आणि क्रेडाई सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, सचिव
अभिजित जैतापकर, खजिनदार अनिल साखळकर यांच्या प्रयत्नातून क्रीडा भवन मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर (प), मुंबई येथे सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रफुल्लजी तावरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून रसिक चौहान – ज्येष्ठ कार्यकारी सदस्य, क्रेडाई महाराष्ट्र, विद्यानंद बेडेकर – उपाध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र, सुरेंद्रजी भोईटे – खजिनदार, क्रेडाई महाराष्ट्र, शहाजी पाटील – सह. सचिव, क्रेडाई महाराष्ट्र, दशरथजी शेट्ये – सह. खजिनदार, क्रेडाई महाराष्ट्र, गजानन कांदळगावकर – क्रेडाई सिंधुदुर्ग,अध्यक्ष, अभिजित जैतापकर – सचिव, अनिल साखळकर – खजिनदार
यांच्यासह विजय प्रभू, पपू नाईक, अभय वालावलकर, विजय तेंडुलकर, ब्रिजेश कोठावळे, पपू पाटणकर, संकेत महाडिक, कुंदन केसरकर, उद्धव साखळकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनात 25 हुन जास्त नामांकित बिल्डर्स, 1000 हुन अधिक प्लॉट्स, 250 पेक्षा जॅझट बंगलोज, तसेच शॉप्स, ऑफिसेस आणि 400 हुन अधिक N.A. प्लॉट्स यांचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून, मोठ्या प्रमाणात नागरिक, गुंतवणूकदार व ग्राहकांनी भेट दिली. मुंबईभर राबविण्यात आलेल्या जाहिरात मोहिमेमुळे प्रदर्शनाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, पुढील दोन दिवसांतही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. कोकणातील प्रॉपर्टी मार्केटला मोठे व्यासपीठ
या प्रदर्शनामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील प्रॉपर्टींना मुंबईतील ग्राहकांपर्यंत थेट पोहोच मिळत आहे.

You cannot copy content of this page