⚡सावंतवाडी ता.०४-: येथील लेदर बॉल क्रिकेटचे प्रशिक्षक यासीन मुलाणी (वय 60, रा. कारिवडे -साईलनगर ) यांचे आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असता त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले. याचवेळी त्यांची प्राणज्योत मालवली. गेली दहा वर्षे बऱ्याच क्रिकेटपटूंना ते क्रिकेटचे प्रशिक्षण देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
