Headlines

मळगाव तेलकाटावाडी येथे १० व ११ रोजी तेलकाटा उत्सव…

१० एप्रिल रोजी ‘स्वरसंध्या व बालनाट्य कार्यक्रम:११ रोजी एकपदा अर्थात पृथ्वीकंकण ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग..

⚡सावंतवाडी ता.०४-: मळगाव तेलकाटावाडी येथील सूयोग कला रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळावतीने आयोजित “तेलकाटा उत्सव” अंतर्गत १० व ११ एप्रिल रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ७.०० वाजता ‘स्वरसंध्या’ हा सुमधुर संगीत कार्यक्रम होणार असून यामध्ये गायक बुवा पुरुषोत्तम परब, बुवा हर्षल मेस्त्री, बुवा कौस्तुभ धुरी यांच्यात तिरंगी संगीत जुगलबंदी रंगणार आहे. या तिन्ही बुवांना तबला-विनोद देऊलकर व पखवाज-सचिन पांगम हे संगीतसाथ करणार आहेत. त्यानंतर रात्री रात्री ९.०० वाजता तेलकाटावाडीतील बालकलाकारा “हसत खेळत उपदेश जीवनाचा” हे नाटक सादर करणार आहेत. त्यानंतर नृत्याविषयक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.
शनिवार ११ एप्रिल रोजी रात्री ९.०० वाजता, लोकराजा सुधीर कलिंगाण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर , कुडाळ यांचा एकपदा अर्थात पृथ्वीकंकण हा ट्रिकसीनयुक्त पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन तेलकाटावाडी येथील सूयोग कला रंगमंच (बाबी लातये यांचे निवासस्थानी) येथे करण्यात आले आहे. रसिक प्रेक्षकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सूयोग कला रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page