ग्रामस्थांत नाराजीचा सूर:कोसळलेल्या रस्त्याला पिंपांचा आधार..
⚡सावंतवाडी ता.२६-: मळेवाड ते आरोंदा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील गुळदुवे – शेटकरवाडी वाडी येथील धोकादायक स्थितीत असलेला रस्ता पावसाळा जवळ आला तरी ,या रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने येथील ग्रामस्थांत असंतोष निर्माण झाला आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या दुरुस्ती कामांबाबत येथील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन दुरुस्ती काम लवकरात लवकर करण्याबाबत निवेदन दिले होते.
मात्र संबंधित विभागाने या दुरुस्तीकडे कानाडोळा केल्याचेच दिसत आहे.
अधिकारी एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत काय? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
सदरील रस्त्याच्या दोन्ही बाजूने वळणे असून,ह्या कोसळलेल्या रस्त्याच्या बाजूला पिंपांचा आधार देऊन संबंधित विभागाने आपले काम केले आहे.एखादी मोठी दुर्घटना घडण्याची संबंधित विभागाचे अधिकारी वाट पाहत आहेत काय. असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
