Headlines

वेंगुर्ला येथे आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त मुकपदयात्रा…

⚡वेंगुर्ला ता.१८-: धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी देव-देश-धर्मासाठी संपुर्ण महीनाभर सूर्याच्या प्रकाशालाही लाजवेल असे तेजस्वी दिव्य बलिदान दिले. त्या संपूर्ण बलिदानाच्या महिन्यात अखंड हिंदू समाजाकडून कौटुंबिक व सामाजिक पातळीवर *धर्मवीर बलिदान मास * पाळत आचरणातून आदरांजली वाहिली जाते व शेवटी बलिदान दिनाच्या दिवशी श्री संभाजी महाराज यांच्या वढु बुद्रुक तुळापूर येथील समाधी येथून धर्मवीर ज्वाला प्रज्वलित करून ती आपल्या वेंगुर्ले शहरात आणून फाल्गुन अमावस्या दिवशी म्हणजेच यावर्षी १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वा. श्री शंभूराजांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेच्या व बलिदानाच्या स्मरणार्थ मूक पदयात्रेत काढण्यात येणार आहे. तरी या मूक पदयात्रेत सहभागी होऊन आपण श्री शंभूराजांना श्रद्धांजली वाहून देव-देश-धर्माच्या रक्षणासाठी कायम कटिबद्ध शपथ घेणार आहोत. ज्या हिंदुस्थान, हिंदूसमाज व हिंदूधर्मासाठी श्री संभाजी महाराजांनी दिव्य बलिदान पत्करले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्व हिंदू बांधवांनी मित्र परिवारासह जात-पात-पक्ष-संप्रदाय, काम-धंदे-व्यवसाय-नोकरी बाजूला ठेवून या मुकपदयात्रेत सहभागी होणे हे आपल्या प्रत्येकाचे आद्य धर्मकर्तव्य आहे. तरी सर्व हिंदुधर्माभीमानी मंडळींनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page