⚡वेंगुर्ला ता.१८-: पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला क्रमांक ४ येथे शनिवार दिनांक १४ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका सानिका कदम यांनी केले. त्यांनी महिला दिनाचे महत्त्व, तसेच शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
शासनाच्या परिपत्रकानुसार इयत्ता पहिली ते तिसरीच्या ‘निपुण भारत’ उपक्रमांतर्गत मातांमधून निवडलेल्या प्रमुख मातांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मेघना राऊळ, सौ. इमले, राधिका नेरुरकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील स्वयंपाकी श्रध्दा वेंगुर्लेकर व मदतनीस समृध्दी परब यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञात परब यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिला दिनाचे महत्त्व सांगून महिलांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरसेविका आकांक्षा परब यांनीही मनोगत व्यक्त करत शाळेच्या प्रशस्त हॉलसाठी पाच सिलिंग फॅन देण्याचे आश्वासन दिले. नगरसेविका समिधा रेडकर, वृंदा गवंडळकर यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत महिलांच्या सहभागाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय डॉ. जाई नाईक यांनी भूषविले. त्यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व सांगितले. यावेळी पालक मातांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे ३० मातांनी सहभाग घेत विविध पदार्थ सादर केले. सर्व सहभागी मातांचा सुपारीचे झाड देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनाही सुपारीचे रोप देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक संतोष परब यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रम कमिटी शिक्षिका सानिका कदम व सदस्य यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला समिती अध्यक्ष श्री अजित राऊळ , उपाध्यक्ष हर्षद परब, नगरपरिषद माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊत तसेच पालक, माता, परिसरातील शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातील सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ व गुलाब देऊन गौरविण्यात आले. पालक व मातांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम आगळावेगळा व संस्मरणीय ठरला.
वेंगुर्ला नं. ४ प्राथमिकशाळेच्या प्रशस्त हॉलसाठीनगरसेविका आकांक्षा परब यांच्यामार्फत पाच सिलिंग फॅन…
