कणकवलीतील राजकीय वाद ; बंडू हर्णे यांच्या विकास निधीवरील दाव्यावर नगरसेवक सत्यजित पारकर यांची टीका…

कणकवली : बंडू हर्णे यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरासाठी विकास निधी आणल्याचा दावा केला आहे, परंतु नगरसेवक सत्यजित पारकर यांनी हर्णे यांची चांगलीच लक्तरे उचलली आहेत.

सत्यजित पारकर यांनी बंडू हर्णे यांच्या विकास निधीच्या दाव्याला फेटाळले असून, ते म्हणाले, “हर्णे हे केवळ वायफळ बडबड करण्यात मश्गुल आहेत. त्यांनी तेव्हा सत्तेत असताना कणकवलीसाठी दिलेला निधी हा त्यावेळचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला होता, हर्णे यांचा त्यात काहीही हात नाही.”

सत्यजित पारकर म्हणाले, हर्णे यांचा अभ्यास कणकवली शहराच्या विकासासाठी उपयोगी नाही. समीर नलावडे आणि बंडू हर्णे हे लोकांनी नाकारलेले लोक आहेत. त्यांचा अभ्यास आणि कार्यक्षेत्र आता कणकवलीच्या नागरिकांना अधिक मनस्ताप देत आहे. आम्ही जनतेच्या बाजूने राहणार असून, बंडू हर्णे यांचे खोटे आरोप जनतेपर्यंत पोचवून त्यांना अज्ञानापासून जागरूक करणार आहोत.”

पारकर यांनी जनतेला आवाहन केले की, हर्णे यांचे खोटे अफवा आणि दावे ओळखून त्यांना बळी पडू नका. कणकवलीच्या राजकारणात हर्णे आणि पारकर यांच्यातील हा वाद चांगलाच चिघळला आहे.

You cannot copy content of this page