यापुढे मराठा समाजाविरोधात बोलणाऱ्यांना वडेट्टीवार यांच्यासारखे उत्तर मिळणार

मराठा समाजाला घाबरून वडेट्टीवारांनी नियोजीत दौरा बदलला-:जिल्हा समन्वयक अँड सुहास सावंत

कुडाळ-: मराठा समाजाच्यावतीने ओरोस रेस्ट हाऊस येथे महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या विरोधात केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करत निदर्शने केली. यावेळी अँड. सुहास सावंत यांनी यापुढे जर कोणी मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य करेल तर त्यांना सिंधुदुर्गात अशाच प्रकारे मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. कालपर्यंत आम्ही बहुजन वादाची भूमिका घेतली होती. परंतु यापुढें मराठा वादाची भूमिका आपली असणार असल्याचा इशारा ऍड सुहास सावंत यांनी दिला. यावेळी अनेक मराठा बांधव उपस्थित होते. महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार नाही. असे विधान करत जातीयवादी भूमिका घेतली होती. मराठा समाज संविधानाने घालून दिलेल्या पद्धतीत आरक्षणाची मागणी करत असताना अशा प्रकारची जातीयवादी भूमिका घेणे चुकीचे असल्याने त्याचा निषेध करण्याचे मराठा समाजाच्या वतीने ठरवण्यात आले होते. यासाठी निषेध करून निदर्शने करण्याचा इशारा देखील मराठा समाजाने दिला होता. परंतु, मराठा समाजाने घेतलेल्या या भूमिकेला प्रशासन एवढे घाबरले की, मंत्री वडेट्टीवार यांनी त्यांच्या पूर्वनियोजित दौरा रद्द करत आपला दौरा ओरोस येथे ठरवला. परंतु, मराठा समाजाचे मावळे कडेकोट पोलिस बंदोबस्त असताना देखील ओरोस रेस्ट हाऊस मध्ये दाखल होत त्यानी निषेध व्यक्त करत निदर्शने केली. येत्या २७ तारीखला छत्रपती संभाजी राजे आपली भूमिका स्पष्ट करणार असून, त्यानंतरच मराठा समाज पुढील रणनीती ठरवणार आहे, असे स्पष्ट केले.

You cannot copy content of this page