*💫वेंगुर्ले दि.२२-:* वेंगुर्ले तालुक्यातील वजराट नंबर १ शाळेने डॉट कॉम असोसियेशन च्या जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. या यशामध्ये शाळेतील इयत्ता पाचवी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु आर्यन विकास मुंजी 200 पैकी 196 गुण मिळवून जिल्ह्यात पहिला येण्याचा मान मिळविला. तर इयत्ता दुसरी मध्ये कू चिन्मयी लक्ष्मण कांदे 160पैकी 158 गूण मिळवून जिल्ह्यात पहिली, इयत्ता तिसरी मध्ये कु कर्तव्य तेजस बांदिवडेकर 200 पैकी 200गुण मिळवून जिल्ह्यात पहिला, तर इयत्ता तिसरी मध्ये कु वेदीका जयंत वजराटकर 200 पैकी 196 मिळवून जिल्हात दुसरी अश्या प्रकारे घवघवीत यश मिळवून शाळेची गुणवत्तेची परंपरा अधोरेखित केली.यां मुलांना शाळेतील शिक्षक श्री संजय परब, श्रीम.वसुंधरा सुर्वे, श्री कृष्णा खरात, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिक्षक श्री तेजस बांदिवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. राजन परब, श्रीम.श्वेता परब यांनी मुलांचे अभिनंदन केले आहे.
डॉट कॉम असोसियेशन च्या जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेत वजराट नंबर १ शाळेचे यश…
