वेंगुर्ले पोलिसांची भाजपच्या प्रसन्ना देसाई यांना नोटीस
*💫वेंगुर्ला दि.२२-:* मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या दौ-याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडण्याजोगा प्रकार घडून, कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचे कृत्य घडून आल्यास, तसेच जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मनाई आदेश लागू केलेल्या आदेशाचा भंग होऊन, कोरोना संक्रमणाचा प्रसार होईल असे कोणतेही कृत्य घडल्यास आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा आशयाची नोटीस वेंगुर्ला पोलिस स्टेशनतर्फे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांना दिले आहे. वेंगुर्ला पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांनी प्रसन्ना देसाई यांना दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, आपण सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायद रद्द केला. त्यामुळे मराठा समाजामध्ये खदखद आहे. यास भरीस भर म्हणून महाराष्ट्र राज्याचे पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीमध्ये मराठ्यांना सामावून घेणार नाही अशाप्रकारचे संतापजनक विधान केले आहे. त्याअनुषंगाने जो पर्यंत वडेट्टीवार मराठा समाजाची जाहीर मागत नाही तोपर्यंत त्यांना सिधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फिर देणार नाही. वडेट्टीवार यांचा दौरा आम्ही होऊ देणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य केले असल्याचे दिसू येत आहे. त्याअनुषंगाने आपणास समत देण्यात येते की, मंत्री विजय वडेट्टीवार यांचा हा शासकीय दौरा आहे. त्यामुळे या दौ-याच्या अनुषंगाने आपल्याकडून कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडण्याजोगा प्रकार घडल्यास आपल्या कायदेशीर कारवाई करण्ध्यात येईल, असे म्हटले आहे.
